आपली शक्तीस्थाने ओळखून देशहित साधा-समुमित्रा महाजन
नागपूर - उत्तम व्यक्तिमत्व घडवायचे असले तर महान आदर्श डोळ्यासमोर असणे आवश्यक असते. नव्या पिढीने स्वातंत्रवीर सावरकरांसारख्या महान व्यक्तींचा आदर्श आपल्यासमोर ठेवला तर ते एक चांगले व्यक्ती म्हणून समाजाचे दायित्व निभावू शकतात. सामान्य माणसाने आपली शक्तीस्थान ओळखून देशहिताचे कर्तव्य बजावले तर नि श्चितच देशाच्या विकासाला मदत मिळेल,असे प्रतिपादन लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आज, शनिवारी नागपुरात केले.
विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात शनिवारी द्विदिवसीय स्वातंत्रवीर सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. वि. स. जोग, स्वागताध्यक्ष कांचन गडकरी, विशेष अतिथी शैलजा जोग, संस्कृती मंडळ पुरस्कृत स्वातंत्रवीर सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे, सचिव डॉ. अजय कुळकर्णी आदी उपस्थित होते.