Breaking News

शेतकर्‍यांचे 14 मे रोजी जेलभरो आंदोलन


पुणे : राज्यातील शेतकर्‍यांना सरसकट कर्ज व वीजबिल मुक्ती मिळाली पाहिजे, स्वामीनाथन स मितीच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा मिळावा, सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवून शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याची शेतकरी सुकाणू समितीची मागणी आहे. या मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 14 मे रोजी राज्यात लाखो शेतकरी जेलभरो आंदोलन क रणार असल्याची घोषणा सुकाणू समितीचे नेते आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी येथे केली. सांगली येथून शहीद दिनापासून म्हणजे 23 मार्चपासून सुकाणू समितीच्या पुढाकाराने शहीद अभिवादन शेतकरी जागृती यात्रेस सुरुवात झाली आहे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन शेतक -यांमध्ये जनजागृती करणण्यात आली. सतत 40 दिवस 11 हजार 300 किलोमीटरचा प्रवास करू न, राज्यभरातील हुतात्म्यांच्या स्मारक स्थळांना भेटी देत ही यात्रा  पुण्यात आली. श्रमिक कामगार भवन ते महात्मा फुले वाड्यापर्यंत शेतकर्‍यांनी रॅली काढली. यावेळी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करुन झालेल्या सांगता सभेत पाटील यांनी ही घोषणा केली. तत्पुर्वी त्यांच्या हस्ते राजेंद्र सोनवणे लिखित शेतकर्‍यांचा कट्टरवाद या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.