Breaking News

आदर्श व्यापारी मंडळ व मॉर्निंग सीसी क्लब आयोजित धावण्याच्या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद.


आदर्श व्यापारी मंडळ व मॉर्निंग सीसी क्लब भगवान महाविर चषक सकल जैन टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा गेल्या सात वर्षा पासून आयोजीत करत आहे.क्रिकेट बरोबरच इतर खेळांचे महत्व ओळखून यावर्षां पासून युवा वर्गासाठी प्रथमच धावण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या .

कुठल्याही खेळात यशस्वी होण्यासाठी शाररीक क्षमता व विविध खेळात युवकांचा सहभाग आवश्यक असल्याची भावना श्री.शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री. नरेंद्र फिरोदिया यांनी सतत क्रिकेट स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त केली होती.

त्यानुसार यावर्षी आयकॉन पब्लिक स्कूलमध्ये आदर्श व्यापारी मंडळ व मॉर्निंग सीसी क्लबतर्फे विविध वयोगटात धावण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या..त्यास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व स्पर्धकांना टीशर्ट देण्यात आली .या स्पर्धेतील विजेत्यांना महावीर चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते पारीतोषीके देण्यात आली. तसेच पुढील वर्षा पासून धावणे, कब्बडी, खोखो आदि स्पर्धाही आयोजित करून जास्तीत जास्त युवकांना त्याचा फायदा होईल अशा प्रकारचे नियोजन करण्याचा संकल्प संयोजन समितीने व्यक्त केला. स्पर्धा यशस्वीतेसाठी आदर्श व्यापारी मंडळ व मॉर्निंग सीसी क्लबच्या सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.