Breaking News

गुलमोहोर रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कथा ऐकण्यास भाविकांची गर्दी


सावेडी उपनगरात गुलमोहोर रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संगीनमय भागवत कथा सप्ताहास भाविकांची गर्दी होत असून आनंद नगरमध्ये सुरु असलेल्या भागवत कथेत श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात सर्वत्र आनंदी-आनंद साजरा करण्यात आला.

श्रीकृष्ण जन्म होताच श्रीकृष्ण पाळणा हलवून पाळणागीते म्हटली. बाळ-गोपाळांनी नृत्य करुन , फटाक्यांची आतिषबाजी केली आबालवृद्धांनी लाडू-पेढे भाविकांना वाटून या जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला.

रविवार पासून सुरु झालेल्या या सप्ताहाचे दिपप्रज्वलम ह.भ.प.दळवी महाराज यानी केले होते. समर्थभक्त मंदार वुवा रामदासी यांच्या अमृतवाणीतून हि कथा श्रवणासाठी सावेडी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. कथेनंतर महाआरती व प्रसादाचे वाटप करण्यात येते माऊली भजनी मंडळाच्या सर्व महिला परिश्रम घेत आहेत.