भर दिवसा घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
पुणे, दि. 30, एप्रिल - भरदिवसा घराचे कुलूप तोडून घरातील दोन लाख 82 हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. वैशाली भूतकर (वय 45, रा. चिंचवड, पुणे) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुतकर नोकरीला आहोजप्रमाणे त्या आपल्या घराला (फ्लॅट) कुलूप लावून गेल्या. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या फ्लॅटचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटून दरवाजा उघडला. बेडरूममधील कपाटातील दोन हजार रुपये आणि सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 82 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. भुतकर घरी आल्या असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे तपास करीत आहेत.