Breaking News

प्रज्ञाताई वाळके यांच्या आरोपाने साबांत खळबळ सी.पी.जोशी-अरविंद सुर्यवंशींची नार्को टेस्ट करण्याची मागणी


मुंबई/विशेष प्रतिनिधी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एकुण कार्यपध्दतीवर संशयाने पाहिले जात असतांना साबां व्यवस्थेचा भाग असलेल्या प्रज्ञाताई वाळके यांनी सचिव आणि अधीक्षक अभियंता यांच्या कार्यशैलीवर नोंदवलेला आक्षेप संशयाचे ढग गडद होण्यास कारणीभूत ठरला आहे. प्रज्ञाताई वाळके यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणार्‍या कथित उच्च पदस्थांना आवर घालावा अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान प्रज्ञाताई वाळके यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्‍वभुमीवर प्रज्ञाताई वाळके यांच्यासह बांधकाम सचिव सी.पी.जोशी आणि अरविंद सुर्यवंशी यांची नार्को टेस्ट व्हावी अशी मागणी पुढे आली आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागातील महत्वाच्या पदांवर काम करणार्‍या अभियंत्यांवर अलीकडच्या काही दिवसात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाल्याने साबांचा कारभार संशयाच्या गर्तेत सापडला आहे. विशेषतः कायदे मंडळ सदस्यांच्या डोळ्यात धुळ फेकून त्यांच्या सहवासात करोडोंचा भ्रष्टाचार करण्याचे धाडस साबांतील भ्रष्टाचाराची लत लागलेल्या मंडळींनी दाखवले.

या संदर्भात सत्ताधारी पक्षाचे आ. चरणभाऊ वाघमारे आणि आ. प्रशांत बंब यांनी हस्तक्षेप केल्याने या भ्रष्टाचाराला वाचा फुटून चौकशी अंती भ्रष्टाचार सिध्द झाला. क ारवाई झाली. मात्र त्यानंतर हा भ्रष्टाचार होण्यास मुंबई साबांचे तत्कालीन मुख्य अभियंता व विद्यमान बांधकाम सचिव (रस्ते) सी. पी. जोशी आणि अधीक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांची भ्रष्ट कार्यपध्दती कारणीभूत असल्याचा आरोप शहर इलाखा साबां विभागाच्या पुर्व कार्यकारी अभियंता प्रज्ञाताई वाळके यांनी काल लोकमंथनशी बोलतांना केला होता.
प्रज्ञाताई वाळके यांनी केलेल्या दाव्यानुसार केवळ शहर इलाखाच नव्हे तर मुंबई साबां प्रादेशिक विभागातील प्रत्येक साबां मंडळात सी.पी.जोशी आणि अरविंद सुर्यवंशी यांनी क रोडोचा अपहार करण्यासाठी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना भाग पाडले आहे. सी.पी.जोशी आणि अरविंद सुर्यवंशी आपल्या पदाचा आणि शासन स्तरावर असलेल्या हितसंबंधांचा गैरफायदा घेऊन कार्यकारी अभियंत्यांना ब्लॅकमेल केले असा स्पष्ट आरोप करतांना प्रज्ञाताई वाळके यांनी या दोघांच्या फोन रेकॉर्डींगचाही हवाला दिला.
लोकमंथनशी प्रत्यक्ष संवाद साधतांना प्रज्ञाताई वाळके यांनी उभयतांच्या वर्तनावरही आक्षेप नोंदवल्याने साबांत या दोघांच्या सहवासात काम करणे जिकरीचे झाले असल्याची भावना साबांत व्यक्त केली जात आहे. प्रज्ञाताई वाळके यांचे आरोप विचारात घेता साबांतील या दोघांच्या कार्यपध्दतीची उच्चस्तरीय चौकशी होणे क्रमप्राप्त मानले जात असून या तिघांची नार्को टेस्ट व्हावी ही पुढे आलेली मागणी रास्त मानली जात आहे.

प्रज्ञाताईंचा आरोप खरा की खोटा?
सीपी जोशी आणि अरविंद जोशी यांच्यावर प्रज्ञाताई वाळके यांनी केलेले आरोप खरे की खोटे? याविषयी साबांत चर्चा सुरू आहे. इतकी वर्ष या दोघांच्या सहवासात काम के ल्यानंतर प्रज्ञाताईंसारखा कार्यकारी अभियंता इतक्या हीन पातळीवर जाऊन आरोप कसा करील? याचाच अर्थ साबांच्या या भ्रष्टाचारात जोशी सुर्यवंशी या वर्गमित्रांचा सहभाग अटळ असावा. म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी अपरिहार्य मानली जात आहे.