Breaking News

कर्जत तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन


कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या वतीने शासकीय दराने हरभरा खरेदी करण्याचे केंद्र चालू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री ना. प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांनी आणलेल्या हरभरा पोत्याचे पालकमंत्र्यांनी पूजन केले. कर्जत तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश चेडे यांनी पालकमंत्री राम शिंदे यांचा सत्कार केला. परिसरातील सर्व शेतकर्‍यांनी या केंद्रावर आपला हरभरा विकण्यास घेऊन यावा असे नामदार शिंदे यांनी आवाहन केले आहे. सर्व शेतकर्‍यांनी आपला हरभरा विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून हरभरा विक्रीसाठी आणावा असे आवाहन संघाचे चेअरमन प्रकाश चेडे यांनी केले. यावेळी कर्जत भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर संघाचे संचालक सर्जेराव बावडकर, बाळासाहेब देशमुख, व्हा. चेअरमन सुखदेव मुळीक, बापूराव जगताप, झुंबर सुद्रीक, हरिभाऊ खेडकर, रमेश बनकर, साहेबराव माने, प्रभारी मॅनेजर कृष्णा अनारसे, अजिनाथ म्हेत्रे, मिरजगावचे सरपंच नितीन खेतमाळस, प्राचार्य नवनाथ टकले, संघाचे सर्व कर्मचारी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.