Breaking News

सुरेशनगर येथे ध्वजारोहण करून डॉ.आंबेडकरांना मानवंदना


नेवासाफाटा (प्रतिनिधी ) - नेवासा तालुक्यातील राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्शगाव सुरेशनगर येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून महामानवाला मानवंदना देण्यात आली. नेवासा पंचायत समितीच्या सभापती सुनिताताई गडाख यांच्या हस्ते डॉ. भीमराव आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.या कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अनिता उभेदळ होत्या. सरपंच पांडुरंग उभेदळ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. तर मिराताई जाधव यांनी बुद्धवंदना म्हटली. यावेळी विठ्ठल पाषाण,होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे, पत्रकार सुधीर चव्हाण, हंडीनिमगावचे सरपंच आण्णासाहेब जावळे, भिवाजी आघाव, पंचायत समिती सदस्य किशोर जोजार यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य आपल्या भाषणातून विषद करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय गायकवाड,कल्याण उभेदळ, भागचंद पाडळे, भगवान दळवी, अँड.कल्याण पिसाळ, नानासाहेब बनकर, बबलू डांगे, बापू शेगर,नाथा बाबर,अण्णाभाऊ क्षिरसागर, चंदाताई रसाळ, ग्रामविकास अधिकारी गणेश इथापे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. संयोजक गणेश दळवी यांनी उपस्थितांचे आभार मानले.