Breaking News

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तरूणांनी अंगिकारावे - आ. बाळासाहेब मुरकुटे


भेंडा प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तरूणांनी अंगिकारावे त्यांनी सर्व जाती धर्मातील लोकांच्या मनात आपले चांगले विचार देण्यात संपूर्ण आयुष्य वाहून टाकले  होते.त्यांनी जगाच्या कल्याणाचा विचार केला. नेवासा तालुक्यातील देवगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जयंती सर्वधार्मियांच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते.यावेळी पंचायत समितीचे सदस्य आजित मुरकुटे , गणपत आगळे , खानसहाबभाई पठाण, कचरदास गुंदेचा, सर्जेराव मुरकुटे ,भावराव काळे, ईश्‍वर काळे , सरपंच महेश निकम , भाऊसाहेब मोरे ,प्रकाश काळे , आर. पी. आय. चे कार्यकर्ते तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य उपस्थित होते.