Breaking News

चोरांच्या आळंदीत स्वार्थाचे भजन किती गाणार..?

खोटे बोल पण रेटून बोल अशा प्रवृत्तीच्या महानुभवांच्या चेहर्यावर पश्चातापाची रेषा कधीच उमटत नाही.केलेल्या कृत्याचा पश्चाताप करण्याऐवजी अहंकाराने समर्थन करण्यातच ही मंडळी हशील मानते.या प्रवृत्ती सर्व समाजात कमी अधिक प्रमाणात सर्वदूर वळवळत असतात.या प्रवृत्तींमध्ये एक अवगूण हमखास आढळतो,नसलेल्या गोष्टी,तत्वहीन ज्ञान आणि अधिष्ठान नसलेले विचार पाजळतांना जावई शोध लावण्याचा बाणा.संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या नावावर पोटभरू दुकानदारी करणार्या मंडळींच्या काफील्यातही अशी एक प्रवृत्ती गेल्या काही दिवसांपासून आपली अक्कल पाजळतांना दिसते आहे.या महानुभवाने मुंबई मायानगरीत चक्क दोन इंदू मिल असल्याचा जावई शोध लावला आहे.घटनाकारांचे होऊ घातलेले स्मारक ज्या इंदू मिल मध्ये आहे ती इंदू मिल सर्वश्रूत आहे.आता या व्यक्तीमत्वाने संत गोरोबा काकांचे मंदीर आणि कुंभार समाजाची २५ हजार चौरस फुट जागा असलेली दुसरी इंदू मिल कधी उभी केली? हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला भेडसावतो आहे.अर्थात हे व्यक्तीमत्व ज्या वैचारीक वातावरणात वावरते त्या वातावरणात याच विचारांना पोसले जाते म्हणून यापेक्षा वेगळी अपेक्षा ठेवणे गैरच.

काल आम्ही पुलगाव येथे महाराष्ट्र कुंभार महासंघाच्या कथित कार्यकारीणी बैठकीत एकमताने झालेल्या निर्णयाचा याच ठिकाणी खरपूस समाचार घेतला होता.हा समाचार घेण्यामागे या कथित बैठकीतून जी मागणी पुढे आणली जात आहे त्या मागणीमुळे कुंभार समाजासमोर उभ्या राहणार्या सामाजिक अडचणी स्पष्ट दिसत असल्यामुळे या कथित नेत्यांच्या बुध्दी शुध्दीचा हेतू होता.तथापी आम्ही सांगीतलेले ते सत्या एव्हढे कटू निघाले की त्याच्या नुसत्या वाचनाने या मंडळींना आमच्या बद्दल असूयेच्या उलट्या होऊ लागल्या.आमच्या विषयी त्यांच्या पोटात असलेली गरळ बाहेर पडू लागली.

आम्ही घेतलेल्या समाचाराला प्रत्यूत्तर देतांना या मंडळींनी काही मुद्दे उपस्थित करून आमचा स्थायीभाव विषद केला आहे.याबद्दल आम्ही त्यांना शतशः धन्यवाद देतो.मुळ मुद्दा असा की,या मंडळींनी पुलगाव येथे ज्या महाराष्ट्र कुंभार महासंघाच्या कार्यकारीणीची बैठक घेतल्याचे,या बैठकीत एकमताने मागणीचा ठराव केल्याचा दावा केला तो महासंघ कुणाचा? या महासंघांच्या त्या बैठकीत सहभागी झालेल्या कार्यकारीणीला पुणे धर्मादाय आयूक्तांनी चेंज रिपोर्ट मंजूर करून मान्यता दिली आहे का? या प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्या श्रध्दा स्थानाला स्मरून प्रामाणिकपणे द्यावीत.या उत्तरातून कुणाचा स्थायीभाव काय आहे याचे उत्तर मिळणार आहे.

या व्यक्तीमत्वाने आणखी एक बाब आपल्या खुलाशात अगदी रेटून सांगीतली आहे.समाजातील मतभिन्नता जगासमोर जाऊ नये म्हणून महासंघावर जाहीर टिका किंवा महासंघाची बदनामी होईल असे विवेचन करीत नाही हा त्यांचा दावा त्यांनी रेटला असला तरी वास्तव समाज जाणतो.मुळात ऐरे गैरे नथ्थू गैरे कितीही आले तरी महासंघाची बदनामी करण्याचे सामर्थ त्यांच्यात नाही.या पविञ व्यासपीठाला हायजॕक करणार्या प्रवृत्तींना ठेचणे यात महासंघाची बदनामी नाही तर महासघाची शुध्दी प्रक्रीया आहे जी समाजाला अपेक्षित आहे.

समाजाला न्याय देण्याच्या नावावर स्वतःचा स्वार्थ साधणार्या या प्रवृत्तींनी प्रत्येक वेळी समाजाला वेठीस धरले आहे.तेर पासून आळंदी पर्यंत जेंव्हा जेंव्हा समाज वैचारिक,सामाजिक,आर्थिक पातळीवर अडचणीत आला त्या प्रत्येक वेळी समाजाच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी समाजाला संभ्रमीत करून स्वार्थ साधला.आळंदीतील दोन एकर जमीन चोरणार्यांना धडा शिकविण्याची वेळ आली तेंव्हा आम्ही समाजासोबत खंबीरपणे उभे राहीलो आणि हे चोरांच्या आळंदीत स्वार्थाचे भजन गात होते.हे खरे की खोटे? 

मग सांगा कुणाचा स्थायी भाव काय आहे?सर्वात महत्वाची गोष्ट ही की,ज्या मागणीवरून हा प्रपंच सुरू झाला ती मागणी दोन समाजात कळ लावणारी आहे हे माहीत असूनही या महानुभवांनी ते धाडस दाखवले.त्यातून समाजाला भोगाव्या लागणार्या दाहक परिणामांचा धोका समोर ठेवून त्यांना सुधारण्याची संधी म्हणून आम्ही खरे तर काल समाचार घेतला.माञ समजण्याची कुवत नाही.सकारात्मक विचार पाञता नाही.शेवटी त्यांनी त्यांचे वैचारीक कुळ दाखवले आणि त्याच्या समर्थनाच्या भानगडीत मुंबईत दोन इंदू मिल असल्याचा जावई शोध लावला.

म्हणे आंबेडकरांचे स्मारक होणारी इंदू मिल आणि संत गोरोबा काकांचे मंदीर असलेली इंदू मिल वेगवेगळ्या आहेत. राज्यशासनाकडे मागणी केली ते मंदिर परेल मुंबई येथील इंदू मिल क्रमांक १ कंपाउंड मध्ये आहे. व केंद्र आणि राज्य सरकार प.पू. डॉ बाबासाहेबांचे स्मारक करीत असलेली इंदू मिल क्रमांक २ ही दादर मुंबई येथे आहे. बापरे! किती खोटारडे पणा हा...दिवसभर सारी मुंबई पालथी घातली,केंद्र राज्य शासनाच्या सर्व अधिकार्यांच्या डोक्याला ताण दिला तरी आम्हाला दुसर्या इंदू मिलचा शोध लागला नाही.

आणि सर्वात महात्वाची बाब म्हणजे त्यांनी त्या मागणीची बातमीचे काञण व्हायरल केले ते कुठल्या विचारांशी बांधिलकी सांगणार्या वृत्तपञाचे याचाही खुलासा त्यांनी करायला हरकत नव्हती.अन्य दोन वृत्तपञांचे काञण तरी व्हायरल करण्याचे दायीत्व निभवायला हवे होते.पण तसे घडणे शक्य नव्हाते कारण मुळात फोडा झोडा मलिदा पळवा हा ज्यांचा स्थायीभाव त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार? अहो किती दिवस समाजाला वेठीस धरून आपले स्वार्थी राजकारण करणार आहात?