Breaking News

अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजगावात मुकमोर्चा

अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजगांव येथे मुकमोर्चा काढून निषेध
केला. जम्मु-काश्मीर राज्यातील कठुआ उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानवी दुष्कृत्याबद्दल देशभरातून निषेध नोंदवत संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. मिरजगांव येथील सर्वधर्म बांधवांनी या निष्पाप मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मिरजगांवातील मुख्य बाजारपेठेतुन मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी हातात काळे झेंडे घेऊन येथील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मुक मोर्चात सर्व धर्माचे लोकही उत्सुकता दाखवून सहभागी झाले, तर मिरजगांवातील व्यापारी बंधूही काही तास आपले व्यवहार बंद करून निषेध कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी आदिराज प्रतिष्ठान मिरजगांवचे बबन दळवी, सलीम आतार, नागेश सोनटक्के, सादिक शेख व मुस्लिम समाज बांधवांनी केले होते. त्याचबरोबर मिरजगाव येथील क्रांती चौकात नगर सोलापूर महामार्गावर मोर्चाकरांनी दीड तास रास्ता रोको करत कठुआ व उन्नाव येथे झालेल्या घटनेचा निषेध केला. यावेळी मिरजगांवचे मा. सरपंच डॉ. ऐ.बी. चेडे, कर्जत पं.स. माजी सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे, कुलदीप गंगावणे, एजाज शेख, जमसिद शेख, डॉ. ज्ञानेश्‍वर गांगर्डे, अ‍ॅड. विशाद मोगल, जब्बार सय्यद, विशाल घोडके, डॉ. रफिक सय्यद पारनेरकर, मंगेश घोडके यांची निषेधपर भाषणे केली. तर या निषेध कार्यक्रमाचे निवेदन शासकीय प्रतिनिधी म्हणून मिरजगांवचे कामगार तलाठी विश्‍वजित चौघुले यांनी स्विकारले.