Breaking News

इंदिरा गांधी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करीता निवड.

श्रीगोंदा तालुक्यातील इंदिरा गांधी पॉलिटेक्निक, बेलवंडी येथे इटॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या रांजणगाव युनिटने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षामध्ये शिकत असलेल्या विदयार्थ्यांसाठी कॅम्पस इन्टरव्हयु आयोजित केला. कॉलेजमधील 19 विदयार्थ्यांना गुणवत्तेवर तृतीय वर्ष निकाला अगोदरच कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. सर्व यशस्वी विदयार्थ्यांना कंपनीने आकर्षक पॅकेजची ऑफर दिली आहे. विदयार्थ्यांच्या कॅम्पस इन्टरव्हयूबाबत कंपनीच्या एच.आर. डिपार्टमेंटच्या प्रभामई प्रधान, महेश देवरे, प्रविण जाधव, कॉलेजचे प्राचार्य एस.बी. गोरे, विभाग प्रमुख हवालदार ए.आय, ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. साळवे एस.एस व विभागातील स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले. निवड झालेल्या सर्व विदयार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, चेअरमन राजेंद्र नागवडे, व्हा. चेअरमन केशव मगर यांसह सर्व विश्‍वस्त मंडळ व निरीक्षक सचिन लगड यांनी अभिनंदन केले.