Breaking News

वरखेड महालक्ष्मी देवीच्या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत : आज यात्रोत्सव


मातंग समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वरखेड येथील महालक्ष्मी देवीचा आज यात्रोत्सव असुन तीन दिवस चालणार्‍या या यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे. पैठण येथुन येणार्‍या देवीच्या पालखी मिरवणूक नंतर देवीला पुरण पोळी व पशु नैवेद्य दीला जातो ( देविला हेलगा, बोकड, कोंबडा, बळी देण्याची फार पुर्वी पासूनची परंपरा आहे. ) दिवसभर चालणार्‍या या कार्यक्रमात राज्यभरातील देवीभक्त सामील असतात. नेवासा तालुक्यातील वरखेड येथील महालक्ष्मी देवी एक प्रसिद्ध देवस्थान आहे. चैत्र शुद्ध पंचमीला देवीची मोठी यात्रा भरते. येथील देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमेटी व प्रशासन यात्रोत्सवाची दरवर्षी मोठ्या उत्साहात जय्यत तयारीकरून चोख बंदोबस्त ठेवतात. गुरुवार रोजी पैठण येथुन देवीची पालखी वरखेड येथे येण्यासाठी निघते ही पालखी भाविक आपल्या खांद्यावर घेऊन येतात पैठण येथुन शेवगाव, शहरटाकळी, भाविनिमगाव, दहिगाव-ने, खामगाव, गोपाळपुर, रामडोह या मार्गावरून जाते. या मार्गावर पालखीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात पुरूष व महिला भाविकांकडुन स्वागत केले जाते. तर पालखी बरोबर असणार्‍या भाविकांची चहा, नाष्टा व जेवणाची व ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मार्गावरील गावातील ग्रामस्थांकडुन करण्यात येते. पालखी पैठण ते वरखेड अशी खांद्यावर आणली जाते ती आणण्याचा मान कहार व भोई समाजाला आहे. पैठण हे देवीचे माहेर असुन वरखेड हे सासर असल्याची व देवीचे कोल्हापूर, पंढरपूर व पैठण नंतर वरखेड असे वास्तव्य असल्याची अख्खायीका आहे. नवसाला पावणारी देवी म्हणून देवीची महती असुन नवसपूर्ती साठी देवीला कोंबडे व बोकड बळी देण्याची परंपरा आहे. वरखेड येथे महालक्ष्मी देवीचे भव्य मंदिर नव्यानेच उभारण्यात आले आहे. तीन दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवात नामवंत लोकनाट्य कला पथके, विविध प्रकारचे खेळणी दुकान, मिठाई दुकान व विविध छोट्या मोठ्या प्रकारच्या दुकानांची मोठी गर्दी असते. लाखोंच्या संख्येने भाविक या दिवशी देवी दर्शनाचा लाभ घेतात. यात्रा काळात विविध पारंपारीक व धार्मिक कार्यक्रमात गुरुवार रोजी तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होम हवन पार पडला असुन रामडोह येथे मुक्कामी ( गोदावरी नदी तिरावर पैठण येथुन आलेली पालखी ) आसलेली पालखी वरखेड गावात प्रवेश करते व या पालखीची गावात मिरवणूक काढण्यात येईल नंतर भाविक देविला नैवेद्य दाखवतात तो कार्यक्रम दिवसभर चालतो तर रात्री उशिरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व शोभेच्या दारूची मुक्त उधळण करीत व नामवंत वाद्य पथकांच्या व कलाकारांच्या अदाकारीत रात्री उशिरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक चालते. हे सर्व कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासन सतत प्रयत्नशील असतात.