Breaking News

पटनोंदणी मध्ये जिल्हा परिषद शाळांची आघाडी


जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थोरात वस्ती, तालुका शेवगाव 2018/19 साठी इयत्ता पहिलीच्या शाळेमध्ये नऊ विद्यार्थी प्रत्यक्ष दाखल झाले असून त्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भाऊसाहेब वावरे यांनी गुलाबपुष्प देऊन शाळेमध्ये स्वागत केले. यावेळी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक शंकर ढोबळे म्हणाले की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कात टाकत असुन शाळेमध्ये वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात तसेच प्रत्येक विद्यार्थ्याकडे आमचे वैयक्तिक लक्ष असून आमच्या शाळेमधील विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होऊन इंग्लीश मिडीयमच्या विद्यार्थ्यांना देखील मागे टाकत आहेत. तसेच शाळेमध्ये 2 एल.सी.डी. प्रोजेक्टर असुन विविध प्रकारच्या खेळणे स्वच्छ सुंदर व निसर्गरम्य परिसर यामुळे आमच्या शाळेचे 100% विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट पूर्ण झालेली आहे. यावेळी बाळकृष्ण कंठाळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंठाळी यांनी केले तर आभार ढोबळे यांनी मानले.