Breaking News

रेल्वे सल्लागार समितीवर लांडे

सोनई:- सेंट्रल रेल्वे च्या सोलापूर डिव्हिजन मधील अहमदनगर रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या सदस्यपदी विभागीय व्यवस्थापानाने सेवाभावी व सामाजिक कार्यकर्ते राजू बाजीराव लांडे यांची नियुक्ती केली आहे. तसे नियुक्तीचे पत्र वाणिज्य निरीक्षक गांधी व आरक्षण अधिकारी पुरकर यांनी लांडे यांना पत्र प्रदान केले आहे. लांडे हे विविध क्षेत्रात सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. त्यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.