डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक : नगराध्यक्षा अनुराधा आदिक
श्रीरामपूर/ शहर प्रतिनिधी / - डॉ. बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनिती , अत्याचार, अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली किड ते मानत असत. ही सामाजिक किड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही असे ते समजत. असा महामानवास त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करते असे प्रतिपादन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी केले. नगरपरिषदेच्यावतीने लोकमान्य टिळक वाचनालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याधिकारी सुमंत मोरे, नगरसेवक ताराचंद रणदिवे, राजेद्र पवार, रवी पाटील, नगरसेवीका शितले गवारे, प्रणिती चव्हाण, कलीम कुरेशी , रईस जहागिरदार, पंडीत बोबले, अलतमश पटेल ,विजय शेलार, सुमित मुथ्था, बाबासाहेब मोरगे,कृष्णा फाजगे, डॉ.राज शेख, सुधाकर आंडागळे, एस.गुप्ता, सरवरअली सय्यद , ग्रंथपाल स्वाती पुरे ,जेष्ठ पत्रकार रमेश कोठारी आदी उपस्थित होते.