प्रेरक, उद्धारक व तारक शक्ती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर - ससाणे
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने काँग्रेसच्यावतीने आझाद मैदान व रेल्वे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक अशा विविध क्षेत्रात आपल्या कुशल नेतृत्वाने त्यांनी दीनदलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. प्रत्येकाच्या मनामनातून समाजक्रांतीचे स्पुंलिंग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुरदाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागरुक केले. त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सचिन गुजर, पक्षप्रतोद संजय फंड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, पंचायत समिती सदस्या डॉ. वंदना मुरकुटे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, भाऊसाहेब डोळस, मुक्तारभाई शाह, दिलीप नागरे, मनोज लबडे, नगरसेविका भारतीताई परदेशी, चंद्रकलाताई डोळस, आशाताई रासकर, मिराताई रोटे, रमादेवी धिवर, मुळा प्रवराचे संचालक संजय छल्लारे, चित्रसेन रणनवरे, ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक लक्ष्मण कुमावत, आशिष धनवटे, मुन्नाभाई पठाण, सुनिल क्षीरसागर, निलेश भालेराव, सुभाष पानसरे, रियाज पठाण, प्रताप देवरे, अरुण मंडलिक, डॉ. राजेंद्र लोंढे, किरण परदेशी, युनूस पटेल, मुन्ना परदेशी, संजय गोसावी, शफी शाह, अॅड. युवराज फंड, सुरेश ठुबे, भोला दुग्गल, विलास पुंड, अतुल गुंड, रावसाहेब आल्हाट, अशोक साळवी, प्रशांत डावखर, मंदार बोरावके, पंजाबराव भोसले, राजेश जोंधळे, प्रतिक बोरावके, सागर दुपाटी आदि उपस्थित होते.