लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण, उन्हाळी शिबीराचे आयोजन
पाथर्डी/विशेष प्रतिनिधी - पाथर्डी तालुका टी 20 क्रिकेट असोशिएशन व एस.व्ही.नेट एम.एम.निर्हाळी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.15 एप्रिल रोजी लेदर बॉल क्रिकेटच्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन कै.सौ.उषाताई बडे मल्टिस्टेटचे चेरमन अमोल बडे यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे यांच्या शुभहस्ते होत आहे. पाथर्डी तालुका टी.20 क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे, सचिव शशीकांत निर्हाळी, विश्वस्त वैभव शेवाळे व एस. व्ही.नेटचे सदस्य विजय पालवे यांनी पाथर्डी तालुक्यातील सर्व आजी माजी क्रिकेटपटू व क्रिकेट रसिकांना, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. शशीकांत निर्हाळी यांच्या अथक परिश्रम व मार्गदर्शनामुळे या शिबीरांतर्गत अनेक खेळाडूंनी राज्य पातळीपर्यंत मजल मारली असल्याने या शिबीराला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.