Breaking News

बेलापुर - परळी रेल्वेे मार्गाचा प्रश्‍न सोडवण्याचे रेल्वेमंत्र्याकडून आश्‍वासन


अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आलेले केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी शनिशिंगणापुर येथे सपत्नीक दर्शन घेतले . यावेळी त्यांना बेलापुर परळी रेल्वेे मार्गाचे निवेदन देण्यात आले हे निवेदन देण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे, खासदार सदाशिव लोखंडे, बेलापुर परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी, सुरेश नरवने, प्रकाश देशमुख, गणेश मोढवे आदि उपस्थित होते.

 या भेटीत हा रेल्वे मार्ग 96 वर्ष कशा प्रकारे प्रलंबित याचा वृतांत त्यांच्या समोर मांडण्यात आला , तसेच या मार्गाला 2022 मधे शंभर वर्ष पूर्ण होणार असल्याने त्यामुळे आणखी किती पिढ्यांना या रेल्वेची वाट पहावी लागणार असा प्रश्‍न लोकप्रतिनिधी व संस्थेने विचारला , यावर मंत्री गोयल यांनी या मार्गाला न्याय देऊ असे आश्‍वासन दिले. तसेच त्यांचे स्वीय सहायक प्रवीण गेडाम यांनी या मार्गामुळे होणारे फायदे लिहून घेतले तसेच बेलापुर परळी चा प्रस्तावाचे मुंबई येथील कार्यालयात आढावा घेतो असे आश्‍वासन दिले. शिंगणापुर येथे दर्शन घेतल्यानंतर ते शिर्डीकडे रवाना झाले शिर्डी येथे दर्शन घेतल्यानंतर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी देखील या मार्गाबाबत निवेदन देऊन या मार्गासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात कुकाणा येथील नागरिकांनी उपोषण केल्याचे म्हटले आहे. 

तसेच या मार्गामुळे रेल्वे, जनता, शासन यांचा कसा फायदा होणार आहे याकडे लक्ष वेधले यावर रेल्वेमंत्र्यांनी वाकचौरे यांना या मार्गाला निश्‍चित न्याय देऊ असे आश्‍वासन दिले. येत्या 10 ते 12 दिवसात रेल्वेचे जनरल मॅनेजर, मुख्यमंत्री देवेन्द्र फडनवीस, खासदार दिलीप गांधी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव लोखंडे , प्रवासी सेवा संस्था यांची संयुक्त बैठक मुंबई येथे घेणार असल्याचे आमदार मुरकुटे यांनी सांगितले. या रेल्वे मार्गासाठी खासदार दिलीप गांधी, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव लोखंडे आमदार बाळासाहेब मुरकुटे ,यांनी कंबर कसल्याने लवकरच या रेल्वे मार्गाचे स्वप्न सत्यात उतरेल अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे.फोटो - रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना निवेदन देतांना ,आमदार बाळासाहेब मुरकुटे ,सेवा संस्थेचे सचिव रितेश भंडारी , सुरेश नरवने, प्रकाश देशमुख, गणेश मोढवे आदी .