Breaking News

आखेगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


शेवगाव, वै. गुरूवर्य नारायण बाबा झिंजुर्के महाराज यांच्या 26 व्या पुण्यतिथी निमित्त आखेगाव येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वै. जोग महाराज संस्थानचे प्रमुख राम महाराज झिंजुर्के यांच्या मार्गदर्शनाखाली आखेगाव येथील संत एकनाथ महाराज मंदिरात वै. नारायण महाराज झिंजुर्के यांच्या पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. 

पहाटे पाच वाजता काकडा भजन, सकाळी सात वाजता गीतापाठ, शिवमहिमा, विष्णू सहस्रनाम, सदगुरू मानस पुजा आदी उपक्रमाने महापुजा करण्यात येईल. सकाळी 9 ते 11 या वेळेत निलेश महाराज वाणी यांचे किर्तन होईल. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप होईल. भाविकांनी या पुण्यतिथी सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.