Breaking News

असिफा अत्याचाराच्या निषेधार्थ राशिनला युक्रांदचा कँडल मार्च


जम्मू काश्मिरच्या कठुआ येथील आठ वर्षीय असिफा या मुलीवर काही नराधमांनी केलेल्या अत्याच्याराच्या निषेधार्थ युवक क्रांती दलाच्या वतीने कर्जत तालुक्यातील राशिन येथे कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. यामध्ये राशीन येथील विद्यार्थी, महिला व पुरूषांनी सहभाग घेवून या घटनेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
यावेळी उपस्थित युक्रांदचे राशिन शहराध्यक्ष किरण पोटफोडे, किशोर जाधव, वसीम काझी, विनोद सोनवणे, सागर जाधव, सागर मदने, मयुर धनवडे, कमलाकर शेटे, गजानन माकूडे, सागर मोढळे तसेच साहिल काझी, शोएब काझी, भिमराव साळवे, अशोक टाक, गणेश कदम, युवराज राजेभोसले, शरद आढाव, विजय सुरवसे, सद्दाम काझी, सचिन साळवे आदी उपस्थित होते.कँडल मार्चमध्ये केंद्र सरकारच्या निषेधाचे फलक आणि राष्ट्रध्वज हातात घेवून आसिफावरील अत्याचाराचा निषेध नोंदविण्यात आला. मुख्य बाजारपेठेतून हा मार्च पोलिस दुरक्षेत्रासमोरील सार्वजनिक ध्वजारोहणाच्या ठिकाणी नेण्यात आला. किशोर जाधव यांचे यावेळी भाषण झाले. शेवटी श्रध्दांजली अर्पण करुन कँडल मार्चचा समारोप झाला.