अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे येथे प्रभाग क्र. 1 मधील गोंधळेमळा परिसरात चौदाव्या वित्त आयोगातून मंजुर झालेल्या दोन रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाचे शुभारंभ जि.प. सदस्य शरद झोडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक महेश झोडगे, ग्रामपंचायत सदस्य शोभाताई गोंधळे, राहुल गोंधळे, महेश झोडगे, तागडकर मेंबर, सावता धाडगे, विठ्ठलमामा सुसे, जगन्नाथ धाडगे, ह.भ.प. अरुण महाराज धाडगे, देवतरसे, अनिल बेल्हेकर आदि परिसरातील नागरिक उपस्थित होते.