बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी हनिफ तांबोली यांची निवड झाल्याबद्दल गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षपदी हनिफ तांबोली यांची निवड झाली असता पीस फाउंडेशनच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष आर्किटेक अर्शद शेख, अन्सार सय्यद, सलीम सहारा, डॉ. इम्रान, खालिद शेख, इम्तियाज शेख, हुसेन शेख, महेबुब शेख, जाकिर शेख आदि उपस्थित होते.
जिल्ह्यात मागील दोन वर्षापासून बाल कल्याण समितीचे कार्य बंद पडले होते. काळजी व सरंक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी उचित आदेश मिळविण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याच्या कार्यभार सोपविण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यातील बाल कल्याण समितीकडे जावे लागत होते. यामुळे बालकांसोबत काम करणार्या बालसेवी संस्थाना आणि समस्याग्रस्त बालकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत होते. दीर्घ प्रतीक्षेनंतर अहमदनगर जिल्ह्यासाठी बाल कल्याण समिती नियुक्त झाल्याने पीस फाऊंडेशनच्या वतीने या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अधिनियमानुसार बालकल्याण समिती प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त केली जाते. 18 वर्षापर्यंन्तच्या काळजी व सरंक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी काम करतांना बालसेवी संस्थांना सुयोग्य आदेश समिती देते. ही समिती पुढील तीन वर्षाच्या कालावधीसाठी नियुक्त करण्यात आलेली आहे. हनिफ तांबोली हे झोपडपट्टीतील बालकांचे आरोग्य, शिक्षण आणि संस्कार यासाठी मागील पंधरा वर्षापासून काम करत आहे. सन 2016 साली मुलांच्या हक्क आणि अधिकाराबाबत जागर मुलींच्या शिक्षणाचा हे अभियान संपूर्ण जिल्ह्यात त्यांनी राबविले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.