Breaking News

शिवराय ते भीमराय या विषयावर व्याख्यान

कर्जत / प्रतिनिधी । 11 ः शिवराय ते भीमराय यामहापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकताना या महापुरुषांनी सर्वसामान्य मानसांची कामे करत त्यांना न्याय दिला, त्यांना समतेची वागणूक दिली असे प्रतिपादन श्रीमंत कोकाटे यांनी व्यक्त केले.
महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध व्याख्यानाचे आयोजन केले होते. यातील पहिला कार्यक्रम श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान, शिवराय ते भीमराय या विषयावर संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत कोकाटे यांचे सह सर्व पत्रकार गणेश जेवरे, मच्छिंद्र अनारसे, आशिष बोरा, निलेश दिवटे, भाऊसाहेब तोरडमल, सुभाष माळवे यांचे हस्ते करण्यात आले.
शिवराय ते भीमराय यांचे एकत्र विवेचन करताना शिवरायांनी व बाबासाहेबांनी स्त्रीयांचा आदर केला. शिवरायांनी स्वत: च्या राज्यात विरोधकांच्या महिलांना सुद्धा सन्मान दिला तर बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून लोकांच्या राज्यात महिलांना आपला अधिकार मिळवून दिला. म्हणून संविधान हाच आपला धर्मग्रंथ होऊ शकतो. हे सांगत जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अनेक भाषा आल्या पाहिजेत. आज मराठीचा जागर उठविणार्‍याची मुले कॉन्व्हेंट मध्ये आहेत.  त्यामुळे मुलांना यशस्वी बनवायचे असेल तर त्याला अनेक भाषा आल्याच पाहिजेत बाबासाहेबाना अनेक भाषा येत होत्या. या दोन महापुरुषांच्या जीवनातील अनेक उदाहरनांचा आजच्या घटनांशी सुसंगत संदर्भ देत कोकाटे यांनी सर्वांनाच अंतर्मुख होऊन विचार करण्यास भाग पाडले. शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी शेतकर्‍यांना शून्य टक्के दराने कर्ज दिले, म्हणून त्या काळात एक ही आत्महत्या झाली नाही. आपल्या कडची पुस्तके खूप विचित्र इतिहास शिकवत आहेत, कारण शिवाजी महाराजांना वाचविणार्‍या व्यक्तीचा उल्लेख होता जिवा म्हणून वाचला शिवा असा एकेरी भाषेत केला जातो. मात्र त्याच ठिकाणी महाराजांवर वार करणार्‍या व्यक्तीचा उल्लेख कृष्णाजी भास्कर असा केला जातो. म्हणजे आदराने कारण का तर वाचवणारा न्हावी या समाजाचा होता तर मारणारा ब्राम्हण होता म्हणून त्याचा उल्लेख कुलकर्णी हे आडनाव वगळून आदराने केला जात आहे. पुस्तकामधून सांस्कृतिक दहशतवाद जोपासला जात आहे. अशा पद्धतीचा चुकीचा इतिहास ब्राम्हणांनी लिहिला. या ब्राम्हणांच्या अमलाखालून मुक्त करण्याचे काम शिवराय व भीमाराय या दोन महापुरुषांनी केल्याचे प्रतिपादन कोकाटे यांनी केले. यावेळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.