Breaking News

आसिफाच्या न्यायासाठी सर्वधर्मीय महामोर्चा


पैठण प्रतिनिधी - जम्मू काश्मिरमधील आठ वर्षीय आसिफावर अत्याचार करून हत्या करण्यात आली. गुजरातच्या सुरत येथील उन्नावमध्येही दलित मुलीवर अत्याचार झाला. देशात अशा घटना वाढत आहेत. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी देशभर आंदोलने होत आहेत. त्यानुसार बुधवारी (दि. १८) पैठण येथेही सर्वधर्मीय सर्वपक्षीय असा अक्रोश मोर्चा काढण्यात आला. हजारोच्या संख्येने महिला त्याचप्रमाणे सर्वधर्मीय नागरिकांची या महामोर्चात उपस्थिती होती.

येथील नेहरू चौक ते तहसील कार्यालय यामार्गे लोकशाही मार्गाने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवदेन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक चंदन ईमले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.