Breaking News

प्रेम, विरहाबरोबर सामाजिक प्रश्‍नांवर गझलेतून प्रकाश


सोलापूर, दि. 30, एप्रिल - आई-वडील यांच्यावरील प्रेम, स्त्री जन्माची व्यथा, प्रेम विरह, सामाजिक ज्वलंत प्रश्‍नांवर गझलकारांनी गझलांतून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शेरेबाजी करून गझलकार प्रेक्षकांना खेळवून ठेवत होते. काहींनी विनोदी गझल सादर केली.ब्रम्हकमळ साहित्य समूह, मुंबई या संस्थेच्या वतीने अ‍ॅम्फी थिएटरमध्ये शब्दोत्सव अर्थात गझल मुशायर्‍याचे आयोजन के ले आहे. या मुशायर्‍याचे उद्घाटन कमळ राजगुरू व अ‍ॅड. जे. जे. कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.
 
ब्रम्हकमळ समूहातर्फे मुशायरा झाला. पहिल्या दिवशी पार्कातल्या कविता मुंबई, काव्य रसिक मंडळ मुंबई, ध्यास गझल औरंगाबाद, कविता रसिक मंडळी पुणे, गजलांकित ठाणे, ब्रम्हकमळ मुशायरा क्रमांक 1 या पाच समूहांनी गझल सादर केली. या कार्यक्रमात पहिल्या दिवशी महाराष्ट्रातून आलेल्या 36 गझलकार व कवींनी सहभाग नोंदविला.