दोन रुग्णालयांत आता एनआयसीयू कार्यान्वित होणार
पुणे, दि. 30, एप्रिल - महापालिकेच्या येरवडा येथील राजीव गांधी आणि सोनावणे रुग्णालयात नवजात अर्भक अतिदक्षता विभाग (नियोनेटल इन्टेन्सिव्ह केअर युनिट’- एनआयसीयू) कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील रुग्णांना याचा लाभ होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते 5 मे रोजी याचे उद्घाटन होणार आहे.
अनेकदा कमी वजनाच्या किंवा जन्मल्यानंतर इतर उपचारांसाठी अर्भकांना इमर्जन्सीची गरज पडल्यास कमला नेहरू किंवा ससून रुग्णालयाला नेण्याशिवाय पर्याय रहात नव्हता. त्यामुळे या दोन रुग्णालयांवरही ताण येत होता. ससूनमध्ये संपूर्ण जिल्ह्यातून रुग्ण येतात. त्यामुळे महापालिका हद्दीतील नवजात शिशुंसाठी या दोन रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे.