Breaking News

निळवंडे’ची निविदा प्रसिद्ध ; मुख्यमंत्र्यांना कोपरगावकरांचे धन्यवाद


कोेपरगांव:राज्यात भाजपा सेना युतीचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या पावणेचार वर्षांत ६०० ते ८०० कोटी रूपयांचा निधी कोपरगांवसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला. यातून कोपरगांवकरांची तहान भागविण्यासाठी निळवंडे-शिर्डी ते कोपरगांव या बंद पाईपलाईनमधून पिण्याच्या पाणी योजनेच्या २६० कोटी रूपये खर्चाच्या प्रशासकीय कामकाजास मान्यता देऊन मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला, असे प्रतिपादन आ. स्नेहलता कोल्हे केले.

निळवंडे कोपरगांव पिण्याच्या पाणी योजनेची ई निविदा प्रसिध्द केल्याबददल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काकडी विमानतळावर नगरपालिकेच्यावतीने आ. कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. मुख्यमंत्री फडणवीस शिर्डी दौ-यावर आले होते. तेव्हा त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, अमृत संजीवनीचे पराग संधान आदी उपस्थित होते. भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद थोरात यांनी स्वागत केले. याप्रसंगी नगरसेवक स्वप्नील निखाडे, दिपक जपे, अतुल काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, संजय पवार, बाळासाहेब आढाव, वैभव गिरमे, अलताफ कुरेषी आदी उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले, कोपरगाव शहराला सध्या पिण्याच्या पाण्याची मोठया प्रमाणात अडचण भासत आहे. निळवंडेचे पाणी कोपरगांवकरांना पिण्यासाठी मिळावे, म्हणून शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येऊन आ. स्नेहलता कोल्हे यांनी त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला होता. आ. कोल्हे म्हणाल्या, शिर्डी संस्थानच्यावतीने या कामाची नुकतीच ई निविदाही प्रसिध्द करण्यात आली आहे. त्याबददल शासनाचे व साईबाबा संस्थानचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. या पिण्याच्या पाणी योजनेच्या कामांस सर्वांनी मदत करावी. संस्थाननेही पाठबळ दयावे. असे त्या शेवटी म्हणाल्या.