Breaking News

वाणिज्य विभागातील व्यवसायिक कोर्सेसकरिता अहमदनगर महाविद्यालय आणि आयसीए करारबद्ध


अहमदनगर महाविद्यालय आणि आयसीए यांच्यात वाणिज्य विभागातील व्यवसायिक कोर्सेसकरिता करार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. आर.जे.बार्नबस, आयसीए प्रमुख प्रकाश बेरड, उपप्राचार्य डॉ.बी.एम.गायकर, उपप्राचार्य कमलाकर भट, डी.बी.मोरे, ए.आर.सोमवंशी, डॉ.सय्यद रज्जाक व वाणिज्य विभागातील प्राध्यापक उपस्थित होते.

अहमदनगरमधील नामांकित कॉलेज म्हणजेच अहमदनगर कॉलेज आणि आय.सी.ए. (दि इंन्स्टिट्युट ऑफ कॉम्प्युटर अकौटंट) या दोन्हीही संस्थांमध्ये नविन शैक्षणिक उपक्रमांसाठी करार झाला. पहायला गेल तर एकीकडे अहमदनगर कॉलेजची स्थापना 1947 मध्ये डॉ. भास्कर पांडुरंग हिवाळे यांनी केली आणि आज 71 वर्षांमध्ये ह्या कॉलेजने देशातील अनेक गुणवंत विद्यार्थी घडवले आहेत. तसेच आपली आगळी-वेगळी ओळख निर्माण केली आहे. तर दुसरीकडे आय.सी.ए. ह्या संस्थेची स्थापना 1999मध्ये सी.ए. एन. के. शामसुख व अन्य सी. ए. मेंबर्सने केली. या संस्थेनेही आज गेल्या 18 वर्षांमध्ये मुलांना अकाऊंटस्, बँकिंग, फायनान्स आणि टॅक्सेशन या क्षेत्रामध्ये योग्य ते प्रात्यक्षिक ज्ञान देऊन आजपर्यंत 4.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकरी दिली आहे आणि त्याच कारणाने आज आय.सी.ए. ही संस्था भारत सरकारच्या कौशल्य विकास (छ.ड.ऊ.उ.) या प्रोजेक्टमध्ये भारतातील नं. 1 पार्टनर आहे.

नोकरीची हमी असलेल्या या अभ्यासक्रमात इंडस्ट्रियल अकांऊंटींग, बॅकिंग, फायनान्स, टॅक्सेशन या चार क्षेत्रातील सहा कोर्सेसे घेतले जाणार आहेत अशी माहिती देण्यात आली असून ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स करायचा असेल त्यांनी अहमदनगर कॉलेजचे प्रा. डी. बी. मोरे यांच्या संपर्क साधावा.