Breaking News

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबिर यशस्वी संपन्न


श्रीरामपुर /शहर प्रतिनिधी / - महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 127 व्या जयंती निमित्ताने स्व .विलासराव पंडित बहुउद्देशीय विकास संस्था व बौद्ध सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मधुमेह रक्तदाब मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते सदर शिबिराचे उद्घाटन माजी आमदार दौलतराव पवार यांचे यांच्या हस्ते श्रीरामपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. सदर शिबिरामध्ये 145 नागरिकांनी तपासणी करण्यात आली. सुप्रसिद्ध मुश्ताक निजामी व त्यांचे तज्ज्ञ सहकारी महंमद शेख , रऊफ शेख यांनी तसेच श्याम काळे यांचे लक्ष्मी लॅबोरेटरी व त्यांचे तंत्रज्ञ विकास सर्वदे विजय महाजन यांनी तपासणी केलेल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिन गुजर मा. जि. प. सदस्य बाबासाहेब दिघे नगरसेवक दिलीप नागरे संजय फंड प्रेमचंद कुंकूलोळ राजेंद्र लोंढे मुक्तार शहा, वंदना मुरकुटे, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, प्राचार्य टी ई शेळके डॉ.वसंत जमदाडे , शौकत शेख डाँ राज शेख, पत्रकार राजेंन्द्र देसाई आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्याकरीता प्रताप देवरे, वैभव पंडित, साठे दिलीप, प्रधान अण्णासाहेब दाभाडे लक्ष्मण मोहन प्रकाश खैरे श्रीराम मोरे देवीदास पंडीत, छाया सोनवणे, मच्छींन्द्र धनसिंग , चन्द्रकांत मगरे, संतोष मोकळ, एफ एन वाघमारे, संजय जगताप, वसंत साळवे, सुगंध राव इंगळे संतोष मोकळ आदिंनी प्रयत्न केले.