Breaking News

महात्मा बसवेश्‍वर समाजासाठी आदर्श - ससाणे

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- संपूर्ण मानवाच्या कल्याणाचे भले करण्याचा विचार करणार्‍या महात्मा बसवेश्‍वरांच्या जयंतीनिमित्ताने काँग्रेसच्यावतीने आझाद मैैदान येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, कर्म हेच कैलास मानणार्‍या महात्मा बसवेश्‍वरांनी हिंदु धर्मातील जाती व्यवस्था आणि कुप्रथांविरुद्ध संघर्ष केला. माणूस हा त्याच्या जन्माने नव्हे तर समाजात केलेल्या कर्माने मोठा होतो, अशी मोलाची शिकवण महात्मा बसवेश्‍वरांनी समाजासाठी दिली. यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, पक्षप्रतोद संजय फंड, माजी सभापती नानासाहेब पवार, ज्ञानेश्‍वर मुरकुटे, नगरसेवक दिलीप नागरे, चंद्रकलाताई डोळस, मुळा प्रवराचे संचालक संजय छल्लारे, चित्रसेन रणनवरे, ग्रंथपाल स्वाती पुरे, संदेश शाहीर, नितीन बुरकुटे, विशाल निकडे, बाळासाहेब लिंगायत, योगेश झाडबुके, संजय कल्याणकर, गणेश दिवसे, काँन्ट्रॅक्टर गाडे, दिनेश वाडणकर, केसकर सर, दिनेश वाकळेकर, डॉ. विवेक बागले, जयेश वाणी, दगडूभाई सय्यद, सुरेश ठुबे, युनूस पटेल, प्रतिक बोरावके, राजेश जोंधळे, जलील शाह, कृष्णा पुंड, सागर दुपाटी आदि उपस्थित होते.