Breaking News

सालवडगाव येथे सार्वजनिक वाचनालयाचे भुमिपुजन

शेवगाव ( प्रतिनीधी ) - तालुक्यातील सालवडगाव येथे कै. रामचंद्र नामदेव भापकर या सार्वजनिक वाचनालयाच्या नविन इमारत बांधकामाचा शुभारंभ जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रमुख राम महाराज झिंजुर्के यांच्या हस्ते करण्यात आला. सालवडगावचे भूमीपुत्र व औरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आपल्या जन्मभूमी मध्ये ग्रामीण भागातील मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी हे वाचनालय सुरू केले आहे. देशातील राज्यातील घडामोडींची माहिती व्हावी . एमपीएससी, युपीएससी, परीक्षेच्या अभ्यासासाठी तरुणांना या वाचनालयाचा फायदा होईल या उद्देशाने त्यांचे आजोबा कैलासवासी रामचंद्र नामदेव भापकर या नावाने हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. यावेळी रामनाथ रूईकर, भीमसेन गिरमकर, चंद्रभान कमानदार, वसंत भापकर, बाळासाहेब वांढेकर, आप्पासाहेब निक्ते, ज्ञानेश्‍वर भापकर, भाऊसाहेब लांडे, रोहिदास रूईकर, भीवसेन औटी, निवृत्ती औटी, नानासाहेब चंदने, रमेश टेकाळे, अशोक भापकर, पंडित भापकर, प्रशांत औटी, अमोल गिरमकर, रविंद्र भापकर, अब्बास शेख, अर्जून निक्ते, रंगनाथ टेकाळे, सचिन दळवी , कैलास मांडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.