कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपीविरूद्ध सुनावणी सुरू
श्रीनगर : देशभरात कठुआ बलात्कार व खून प्रकरणी संतापाची लाट उसळली असून, याप्रकरणी आरोपींना फाशी शिक्षा देण्यात यावी यासाठी देशभरात आंदोलने करण्यात येत आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8 आरोपींविरोधात आजपासून सुनावणी सुरू होणार आहे. या आरोपींना येथील जिल्हा न्यायालयात नेण्यात आले आहे. संबंधित आरोपींवर जानेवारीमध्ये 8 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून गावातील मंदिर परिसरात बलात्कार व खून केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये एक आरोपी अल्पवयीन आहे. कठुआ येथील मुख्य न्यायदंडाधिकारी सोमवारी आरोपपत्र तयार करतील. यात 7 आरोपींचा उल्लेख आहे. मात्र, अल्पवयीन आरोपीची सुनावणी राखीव ठेवली असून त्याची सुनावणी अल्पवयीन गुन्हेगार कायद्याअंतर्गत संबंधित न्यायालयात होईल. जम्मू काश्मीर सरकारने या संवेदनशील प्रकरणात 2 विशेष सरकारी वकिलांची नेमणूक केली असून दोघेही शीख आहेत. या नियुक्तीमागे तटस्थता जपत सुरू असलेले हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण टाळणे हे असल्याचे सांगितले जात आहे. याआधी आरोपपत्र दाखल करताना वकिलांनी केलेल्या गोंधळाची दखल थेट सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून 13 एप्रिलला जम्मू बार आणि कठुआ बार असो सिएशनला याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे उद्याची सुनावणी सामान्य होईल, असे अपेक्षित आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्वतः याबाबत तक्रार दाखल करुन घेतली आणि अशाप्रकारे अडथळा निर्माण करणे थेट न्याय देण्याच्या व मिळवण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करते, असे स्पष्ट केले होते.