Breaking News

नगरच्या जिल्हाधिकारीपदी राहूल द्विवेदी ; पालिका आयुक्तपदी एम जी अर्दाड

अहमदनगर : राज्यात सोमवारी प्रशासनात मोठया प्रमाणावर फेरबदल पहावयास मिळाले असून, तब्बल 25 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. अहमदनगरच्या जिल्हाधिकारीपदी राहूल द्विवेदी तर महापालिकेच्या आयुक्तपदी एम.जी अर्दाड यांची नेमणूक करण्यात आली आहे. केडगाव दुहेरी राजकीय हत्याकांडामुळे चर्चेत आलेल्या नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभय महाजन यांचीही बदली करण्यात आलीय. तिथे आता राहूल द्विवेदी हे जिल्हाधिकारी पदाचा कारभार सांभाळणार आहेत.


शेखर चन्ने यांची परिवहन आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पुणे जिल्हाधिकारीपदी नवलकिशोर राम यांची बदली करण्यात आली, तर पुणे मनपा आयुक्तपदी सौरव राव यांची बदली करण्यात आली. पनवेलचे आयुक्त सुधाकर शिंदे यांची बदली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या सीईओपदी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीची स्थानिक नगरसेवकांनी मागणी केली होती.