नळांना मोटार लावल्यास दंडात्मक कारवाई
राहुरी : देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतीतील नागरिकांनी उन्हाळयाच्या दिवसातील पाणी टंचाई लक्षात घेता नळांना वीजेची मोटार लावल्यास संबंधितांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याची मोहिम हाती घेण्यात आली.
याबाबत नागरिकांनी नगरपालिकेस सहकार्य करुन नळाला पाणी येत नसल्यास नगरपालिकेकडे लेखी स्वरुपात तक्रार कराव्यात. नागरिकांनी दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी वीजेची मोटार लावणे टाळावे, असे आवाहन नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, पाणीपुरवठा समिती सभापती सुजाता कदम, बांधकाम समिती सभापती संजय बर्डे, आरोग्य समिती सभापती नंदा बनकर, महिला व बालकल्याण समिती सभापती बेबी मुसमाडे, महिला व बालकल्याण समिती उपसभापती केशरबाई खांदे आदींनी केले आहे.
