बुद्धांच्या विचाराने भारत बौध्दमय : ढवळे
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५० साली या देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाही प्रदान केली. भारत देश गौतम बुद्धांच्या विचाराने त्यांनी बौध्दमय केला, असे मत एकलव्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यानी व्यक्त केले.
संगमनेर तालुक्यातील वरंवडी येथे आयोजित संयुक्त जयंती उत्सव व शाखा उद्धघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रिपाईचे संगमनेर तालुकाध्यक्ष अशिष शेळके होते. श्रावण वाघमारे, संजय खामकर, सुरेंद्र थोरात, देविदास माळी, उपसरपंच सुभाष वर्पे, रमेश भोसले, अनिल रोकडे, पोलिस निरिक्षक अनिल कटके, शेखर भोसले, सचिन बकुळे, ज्ञानदेव केदारी, केरुनाथ भोसले, अनिल बर्डे, नानासाहेब बर्डे, संपत भोसले, दादू भोसले, नवनाथ भोसले, राजू बर्डे आदींसह भीमक्रांती तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी रिपाईच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंकर भोसले, दत्तू भोसले, अंतोन भोसले, भिमराज भोसले, प्रभाकर भोसले, नामदेव केदारी, भीमक्रांती तरुण मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि वरंवडी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.
