Breaking News

श्रीरामपूरच्या महाआघाडीत झाली महाबिघाडी!


काँग्रेस नेते स्व. जंयत ससाणे यांची नगरपालिकेतील सत्ता घालविण्यासाठी राज्यात भाजप व शिवसेनेचे सरकार असताना श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चक्क भाजप आणि शिवसेनेने राष्ट्रवादीच्या अनुराधा अनुराधा आदिक यांना विजयी केले. मात्र श्रीरामपूरमध्ये तयार झालेल्या महाआघाडीत सद्यस्थितीत महाबिघाडी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा आदिक यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. 
तालुक्यातील राजकारणात देशात नव्हे तर राज्यातदेखील अशी महाआघाडी झाली नाही. मात्र अनुराधा आदीक यांना निवडून देऊन माजी आ. भानुदास मुरकुटे यांना पश्चाताप होत आहे. तर भाजपचे प्रकाश चित्ते यांनी आदिक यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी तर जाहीर कबुल दिली आहे, की माझी आयुष्यात सर्वात मोठी चूक झाली आदिक यांना पाठिंबा दिला. श्रीरामपूर शहरातील राजकारणी लोकांनी महाआघाडी केली. मात्र यामध्ये महाबिघाडी आहे, अशी चर्चा ऐकायला हल्ली मिळत आहे. मात्र या मंडळींना नगराध्यक्षा आदिक यांच्यापासून नक्की काय त्रास होत आहे, हे अद्याप समजले नाही. दरम्यान, यासंदर्भात नगरध्याक्षा आदिक यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या भानुदास,मुरकुटे यांनी मला मानस कन्या मानले आहे ते माझ्या वडिलांसमान समान आहेत. त्यांना माझ्यावर रागावण्याचा अधिकार आहे. ते रस्त्यावर जरी भेटले, तरी मी पाया पडेन. कोण काय बोलते, याकडे मी लक्ष देत नाही. मला शहरातील विकासकामे करायची आहेत. मी ते करणार हे निश्चित आहे. त्यामुळे असे किती आरोप कोणी केले तर मला काही फरक पडत नाही.