Breaking News

चिंता करण्यापेक्षा आत्मचिंतन करणे गरजेचे : परमानंद महाराज


कोपरागाव ता. प्रतिनिधी - माणसाने चिंता करत बसण्यापेक्षा हृदयातील आत्म्याचे आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. चिंतनाने आत्मस्वरूपाचे ओळख आपल्या हृदयातून होते. आत्मा हाच परमेश्वर आहे. ही शिकवण ओमगुरूदेव माऊलींची आहे, असे प्रबोधन आत्मा मालिक ध्यावन पिठाचे संत परमानंद महाराज योनी केले. 

कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमातील आत्मा मालिक ध्यान पिठाच्यावतीने आयोजित तीन दिवसीय चैत्र महोत्सवात ते बोलत होते. या महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातील सत्संग कार्यक्रमास ओम गुरूदेव जंगलीदास महाराज, संत देवानंद महाराज अनेक संतगण, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, कोषाध्यक्ष विठठलराव होन, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, विश्वस्त उदय शिंदे, वसंतराव आव्हाड, माधवराव देशमुख, बाळासाहेब गोर्डे, प्रकाश भट, प्रकाश गिरमे, प्रभाकर जमदाडे, विष्णुपंत पवार, उमेश जाधव आदी उपस्थित होते. 

दरम्यान, सकाळी तीन दिवशीय ध्यान योगा प्राणायम शिबिराची सांगता संत मांदियाळीच्या उपस्थित करण्यात आली. योग प्रशिक्षक अभिजीत शहा, रामेश्वर पाचोरे यांना संत प्रसाद देऊन गौरविण्यात आले. सत्संग कार्यक्रमामध्ये गोपाल शर्मा, सुधा ठोळे यांच्या भजन गायनाने ध्यानपिठाचा परिसर भक्तीमय झाला होता. केदार सारडा यांनी उपस्थित भाविकांचा प्रवचनरूपी प्रबोधन केले.

चैत्रमहोत्सवाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे, मुंबई विमानतळ विभागाचे प्रमुख अनिल ठाकूर आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावुन संत परिवाराचे दर्शन घेतले.

चैत्र महोत्सवाच्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने देश विदेशातील हजारो भावी आत्मा मालिक ध्यान पिठात आल्याने संपूर्ण परिसर भक्तांनी फुलून गेला होता. ओगुरूदेव जंगलीदास माऊलीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सदगुरूंची सेवा म्हणून काही भाविकांनी श्रमदान केले. काहींनी अन्नदान करून आपली सेवा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे, सुधाकर मलीक, माणिकराव जाधव, संदीप गायकवाड, कांतीलाल पटेल आदींसह विविध विभागाचे शिक्षक, सेवकवृंद, विद्यार्थी, भाविक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.