Breaking News

समोरासमोर झालेल्या दुचाकी अपघातामध्ये एकाचा मृत्यू

कर्जत तालुक्यातील कुळधरण येथील फोटोग्राफर राजेश जगताप हे श्रीगोंदा येथील आपले काम आटपून आपल्या मोटार सायकल वरून कुळधरणला येत असताना समोरू येणार्‍या मोटार सायकलची समोरासमोर टक्कर होवून झालेल्या आपघातात राजेश जगताप जागीच ठार झाले. तर गणेश संभाजी मेहेत्रे जबर जखमी झाले. हा अपघात घोडेगाव हद्दीत कुकडीच्या 13 नंबर चारीजवळ दिलीप दरेकर यांचे जमीनीलगत झाला. कर्जत येथील गणेश मेहेत्रे हे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी 108 अ‍ॅम्बुलन्सने हलविण्यात आले. गणेश मेहेत्रेने हेल्मेट घातलले असल्यानेच त्यांचे प्राण वाचले. मात्र या अपघातामध्ये ते जबर दुखापत झाली. तर राजेश जगताप यांच्या डोक्याला जबर मार लागल्येने ते जागीच ठार झाले.