Breaking News

उक्कलगांव परिसरात ’ रानटी ’ पिसाळलेल्या कुंञ्याचा धुमाकूळ


श्रीरामपुर ता. (प्रतिनिधी)- उक्कलगांव परिसरात रानटी पिसाळलेले असलेले कुत्रे धुमाकूळ घालत असून आत्तापयंर्ंंत एका मुलांसह दोन महिलेला चावा घेतल्याची महिती समोर आली आहे. एका महिलेला गंभीर जखमी केले आहे. यामुळे सर्वञ घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्रे चावल्यामूळे भयभीत झालेल्यांनी तात्काळ दवाखान्याचा रस्ता धरला तर काहींनी प्राथमिक उपचार सुरु केले आहेत. गाव परिसरात कुत्र्यांचे टोळकेच टोळके परिसरात दिसुन येत आहे. घराबोहर खेळणा-या लहान मुलांना तर या कुञ्या पासुण मोठी भिती निर्माण झाली आहे. त्यात पिसाळलेल्या कूंञ्याच्या लसी या अत्यंत महाग आहेत. उक्कलगांवच्या उपकेंद्रात लस उपलब्ध नसल्यामुळे त्या रुग्यानां बेलापुर आरोग्य केद्रांचा आधार घ्यावा लागतो. तेथेच उपचार करावा लागतो.