Breaking News

तुकाई चारीच्या मंजूरीने शेतकरी सुखावले


तुकाई चारीची मंजूरी शासन दरबारी भांडून मिळविल्याबद्दल ना. राम शिंदे यांचा सत्कार टाकळी खंडेश्‍वरीचे शेतकरी बाबा तांबे यांनी केला. कर्जत तालुक्यातील 21 गावांना तुकाई चारीचा फायदा होणार असल्याने तसेच तुकाई चारीच्या लाभ क्षेत्रात शेतकरी वर्गात व लाभार्थी गावांतील नागरीकांमध्ये समाधान पसरले आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरीही भारावून गेले आहेत. त्यामुळेच बाबा तांबे यांनी ना. राम शिंदे कर्जतला आल्याचे समजताच तुकाई चारीस मंजूरी मिळाविल्यानेच त्यांचा सत्कार केला. यावेळी नगराध्यक्ष नामदेव राऊत, भाजपाचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, उप सभापती प्रशांत बुध्दिवंत, युवा नेते स्वप्नील देसाई, शिवसेना नेते अमृत लिंगडे, सरपंच काकासाहेब धांडे, देवराव गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.