Breaking News

शहर इलाखातील भ्रष्ट उंदरांनी पोखरले मंत्रालय रणजीत हांडे - प्रज्ञा वाळकेंना डेब्रीजचे इन्फेक्शन

मुंबई/विशेष प्रतिनिधी - सार्वजनिक बांधकाम खात्याच्या निधीला कुरतडून पोसलेल्या भ्रष्टाचाराच्या उंदरांनी मंत्रालयाची इमारत पोखरल्याची तक्रार आ. चरण भाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. गेल्या पाच वर्षातील शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांबाबत सातत्याने वाढत असलेल्या तक्रारींमुळे या विभागावर साबांच्या सर्वाधिक भ्रष्ट विभाग म्हणून शिक्क ामोर्तब झाले आहे. विशेषतः कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके यांच्या काळात झालेल्या गैरव्यवहारांवर बोट दाखविले जात आहे.


मंत्रालयाच्या इमारतीतून अवघ्या राज्याच्या कारभारावर अंकूश ठेवला जातो. मात्र या इमारतीत सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असलेल्या कामांवर कुणी अंकुश ठेवायचा असा प्रश्‍न गेल्या काही दिवसात सातत्याने होत असलेल्या तक्रारींमधून निर्माण झाला आहे. मंत्रालय, मंत्रालयाचा परिसर आमदार निवास या इमारतींची देखभाल - दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागातील कामकाज निरंकुशपणे सुरू असल्याचे निष्पन्न झाले असून कार्यकारी अभियंत्यांच्या कामकाजावर वरिष्ठांचा आणि साबां मंत्रालयाचा धाक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहर इलाखा साबां विभागाचे कार्यकारी अभियंता रणजीत हांडे व प्रज्ञा वाळके यांच्या काळातील कामकाज शैलीने मंत्रालयालाच हादरे बसू लागले आहेत. विशेषतः हांडे यांच्या क ाळातील मंत्रालय काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक आणि या कामांचे देयके अदा करण्याच्या प्रज्ञा वाळके यांच्या पराक्रमासह मंत्रालयातील काँक्रीटीकरण उखडण्याचे बोगस काम दाखवून काढलेले डेब्रीज आणि त्याची अदा केलेली देयके संशयाच्या भोवर्‍यात आहेत. या संदर्भात भाजपाचे आमदार चरणभाऊ वाघमारे यांनी दि. 6 फेब्रुवारी 2018 रोजी तक्रारही दाखल केली आहे.
दि. 23 मार्च 2015 ते 24 नोव्हेंबर 2015 या काळात रणजीत हांडे यांनी कार्यकारी अभियंता म्हणून काम करतांना 3 ऑगस्ट रोजी एक तर 14 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी चार तर 19 नोव्हेंबर रोजी एक वर्क ऑर्डर काढून मंत्रालयातील साफ सफाईच्या कामाचे वाटप केले. तर त्यानंतर पदभार स्वीकारलेल्या प्रज्ञा वाळके यांनी 23 मार्च 2016 रोजी शेवटची वर्क ऑर्डर काढली विशेष म्हणजे ज्या कामांच्या वर्क ऑर्डर या दोन कार्यकारी अभियंत्यांनी काढल्या ते काम 17 जुलै 2015 रोजी 77 क्रमांकाच्या कार्यारंभ आदेशाने सुमित फॅ सिलिटीज प्रा. लि. कंपनीला दिले गेले होते. या कामाचे अंदाजपत्रक तब्बल चार कोटी पंच्याऐंशी लाख पंचवीस हजार नऊशे सत्तेचाळीस एवढे आहे. हे काम सुरू असतांना हांडे आणि वाळके या दोन कार्यकारी अभियंत्यांनी 7 कार्यारंभ आदेश काढून कामे न करताच कामे झाल्याचे दाखवून भ्रष्टाचार केला, असा आरोप आ. वाघमारे यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या वर्क ऑर्डरशी संबंधित डेब्रीजचे कामे न करता कागदोपत्री कामे दाखवून 20 लाखाहून अधिक निधीचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे.


अशी निघाली वर्क ऑर्डर
1) वर्कऑर्डर क्र. 93/2015-16 दि. 03/08/2015
2) वर्कऑर्डर क्र. 292/2015-16 दि. 14/08/2015
3) वर्कऑर्डर क्र. 300/2015-16 दि. 14/08/2015
4) वर्कऑर्डर क्र. 302/2015-16 दि. 14/08/2015
5) वर्कऑर्डर क्र. 334/2015-16 दि. 14/08/2015
6) वर्कऑर्डर क्र. 849/2015-16 दि. 19/11/2015
7) वर्कऑर्डर क्र. 1743/2015-16 दि. 23/03/2016


हा आहे पराक्रम
दि. 17.8.2015 रोजी 830 मजुर मंत्रालयातील विविध ठिकाणी साफसफाईसाठी लावले.
मंत्रालयात एकाच वेळी 830 मजुरांनी केलेला प्रवेश ऐतिहासिक ठरला. गृहविभागानेही घाऊक प्रमाणात प्रवेश कसा दिला?
सामान्य प्रशासन विभागाची परवानगी होती का? या एवढ्या संख्येच्या मजुरांवर देखरेख करण्यासाठी किती सुपरवायझर होते? या घाऊक संख्येतील मजुरांना दुपारचे जेवण देण्यासाठी 830 डब्बे कुणी दिले. 250 टोपले, 250 फावडे, 250 टिकाव, कुदळी या साहित्यांची नोंद कुणी घेतली?
एवढ्या मजुरांनी काढलेले डेब्रीज उचलून कुठे जमा केले.


हायब्रीड अन्यूटीच्या बारशाला 23 हजार कोटीची बिदागी
भ्रष्टाचाराच्या दक्षिणेवर उपजिविका करणारे बांधकाम सचिव सी. पी. जोशी, लवासातून हाकललेला आचार्य, मराठवाड्यातील भ्रष्टाचार अपचन झाल्यानंतर तोंड लपवत फिरणारे धोंडगे आणि चंद्रकांत दादांसोबत सावलीसारखे वावरूनही प्रतिष्ठेला दंश करणारे खासगी सचिव श्रीनिवास जाधव या चौकडीच्या अभद्र युतीचा कारनामा... 23 हजार कोटीचा रस्ते घोटाळा...
असंगाशी संग झाला तर उत्पत्ती सदोषच निपजणार हा निसर्ग नियम आहे. शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे संत वचन म्हणूनच अनन्य ठरले आहे. बुध्दी भ्रष्ट झाली की वर्तनही भ्रष्ट होते. संपत्तीचा सोस बुध्दी भ्रष्टतेचे प्रमुख कारण आहे, हाच हव्यास सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अभियंत्याच्या बुध्दी भ्रष्टतेला कारणीभूत ठरला असून बुध्दीभ्रष्ट अ भियंत्यांचे वर्तनही भ्रष्ट बनले आहे. याच भ्रष्ट बीजाला पोसले गेल्याने सार्वजनिक विभागात भ्रष्टाचाराला मांडीवर खेळवणारे नवे बाळ जन्माला घातले गेले आहे. हायब्रीड अन्यूटी... या बाळाच्या बारशालाच तब्बल 23 हजार कोटीच्या गैरव्यवहाराची अंगाई गायीली गेली आहे. या बारसे सोहळ्याचे मानकरी आहेत अर्थातच बांधकाम सचिव सी. पी. जोशी, क धीकाळी जामीनासाठी पार्श्‍वभागाला पाय लावून पळणारे धोंडगे आणि झाल पळवणारा, लवासातून हुसकावून लावलेला नेटकरी शाखा अभियंता आचार्य. विशेष म्हणजे बांधकाम मंत्र्यांची सावली म्हणून स्वतःला प्रमोट करणारे खासगी सचिव श्रीनिवास जाधव हे देखील या बारशाच्या समारंभाचे प्रमुख निमंत्रक आहेत. या निमंत्रकांची आजवरची कर्मकुंडली सोमवारपासून तपशीलात..