Breaking News

मराठा आरक्षणासाठी गावोगावी संपर्क अभियान


नगर । प्रतिनिधी - राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, बालसराफ, डॉ.राजेश करपे यांच्या उपस्थितीत 2 मे रोजी नगरमध्ये मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. आयोगासमोर मराठा आरक्षणाबाबत मोठ्या संख्येने अभ्यासपूर्ण निवेदने व आरक्षणाची मागणी योग्यप्रकारे मांडली जावी म्हणून प्रत्येक तालुक्यात चांगल्या प्रकारे पूर्वतयारी करण्यासाठी दि.26 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृहावर सकल मराठा समाज-मराठा क्रांती मोर्चाची जिल्हा बैठक झाली. बैठकीस अहमदनगर शहर व जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. मराठा आरक्षणासाठी गावोगावी संपर्क अभियान राबविण्याची तयारी करण्यात आली आहे. बैठकीच्या सुरुवातीस मराठा क्रांती मोर्चा वेळी सक्रिय काम करणारे कै.बाळासाहेब पवार व कै.कैलास मामा गिरवले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.