Breaking News

जिल्हा रुग्णालय परिसरात अवैध तबाखूजन्य पदार्थ विक्रीवर कारवाई


नगर । प्रतिनिधी - जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय परिसरात होत असलेल्या अवैध तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर अन्न औषध प्रशासन व राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण विभाग नगर यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी पवार, बाचकर व जिल्हा सल्लागार ( तंबाखू नियंत्रण) डॉ. पठारे, गणेश शिंदे दत्तात्रय जटाडे यांनी सहभाग घेतल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक गाडे यांनी दिली.