Breaking News

ज्ञान व महा अवयवदान जनजागृती रॅली उत्साहात

अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक ज्ञान दिना निमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व ज्ञानदीप फाऊंडेशनच्या वतीने भिंगार ते मार्केटयार्ड चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पर्यंन्त ज्ञान व महा अवयवदान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत आकर्षक सजविलेल्या रथामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा विराजमान होता. या रॅलीद्वारे नागरिकांना अवयवदानाचे आवाहन करण्यात आले. 


भिंगार येथील भगवान गौतम बुध्द जॉगिंग पार्क येथून या रॅलीचा प्रारंभ झाला. कॅन्टोमेंन्ट हॉस्पिटल ते नगर तालुका पोलिस स्टेशन, नगर पाथर्डी रोड मार्गे भिंगार वेस, स्टेट बँक चौक, चांदणी चौक येथून या रॅलीचे मार्गक्रमण होवून मार्केटयार्ड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप झाला. यामध्ये फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज लोखंडे, भन्ते महानाम, राजेंद्र लोखंडे, अ‍ॅड.भानुदास होले, पॉल भिंगारदिवे, सनी साळवे, अ‍ॅड.महेश शिंदे, जावेद सय्यद, साहिल मुलानी, अमित लोखंडे, अक्षय ससाणे, जॉनसन लोखंडे, भारती साळवे, प्राजक्ता लोखंडे, रेखा मिसाळ, प्रा.बन्सी ठोंबे, युवराज पाथरे आदि सहभागी झाले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी मार्केटयार्ड चौकात संस्थेच्या वतीने महा अवयवदान कार्यक्रम घेवून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती तैलचित्र साकारले जाणार असल्याची माहिती पंकज लोखंडे यांनी दिली.