नगर । प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र असलेला महालाचा देखावा पाहण्यासाठी आंबेडकरप्रेमी गर्दी करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने नगरसेवक विजय गव्हाळे यांच्या पुढाकाराने रेल्वे स्टेशन येथे तीस फुटी उंच व 70 फुट रुंद असा महाल साकारण्यात आला आहे. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे. या महालाला फुलांची सजावट व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. हा देखावा नागरिकांचे लक्ष वेधत असून देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करीत आहेत. रेल्वे स्टेशन परिसर देखाव्याच्या विद्युत रोषणाईने उजळला आहे.