मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची प्रचंड चर्चा!
राहुरी प्रतिनिधी - देवळालीप्रवरा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम आणि मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्यातील वादाला ३ आठवडे होऊन गेले. मात्र ३१ मार्च रोजी अचानक गांगोडे यांची बदली करण्यात आल्याचा आदेश आला. त्यामुळे या बदली आदेशाचीच सध्या येथे प्रचंड चर्चा आहे.
मुख्यधिकारी गांगोडे व नगरध्यक्ष कदम यांच्या वादाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष कदम यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करत मुख्याधिकारी गांगोडे यांच्या बदलीसाठी पाठपुरावा केला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, मुख्याधिकारी गांगोडे यांची नांदेड जिल्हयातील किनवट नगरपरिषदेमध्ये बदली झाली. मुख्याधिकारी गांगोडे यांनी पदभार सोडून किनवट नगरपरिषदेत हजर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र मार्चअखेरला घरपट्टी व पाणीपट्टी वसुली न झालेल्या मालमत्ताधारकांविरोधात कारवाई करण्यासाठी देवळाली प्रवरा. नगरपालिकेत मुख्याधिका-यांची अद्याप नेमणूक झालेली नाही. त्यामुळे आबा याबाबत काय निर्णय घ्यायचा, हा पेच येथे निर्माण झाला आहे.