Breaking News

स्वस्तात सोनेप्रकरणी एकास अटक


जवळा प्रतिनिधी - स्वस्तात सोने प्रकरणी एका आरोपीस पकडण्यात जामखेड पोलिसांना यश आले आहे. बेळया टकार्‍या काळे असे या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दि. ३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. 

बेळया काळे हा सोने प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आरोपी असून, जामखेड पोलीसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर करमाळा तालुक्यातील टाकळी येथे बेळयास सापळा रचून मोठ्या शिताफीने पकडण्यात आले. दरम्यान, अद्याप तीन आरोपी केळ्या टकार्‍या काळे, संगिता केळया काळे व महावीर केळया काळे हे फरार आहेत. मंगळवारी (दि. २७ ) स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने महिलेसह तिघांनी दोन आयुर्वेद डॉक्टरांना तालुक्यातील जवळा येथे बोलावून घेतले. त्यातील एका डॉक्टरचा खून केला. मृत व्यक्तीच्या भावालाही जबर मारहाण करण्यात आली होती. यानंतर पोलिस या आरोपीचा तपास करत होते. फिर्यादी मयताचा भाऊ मनोरंजन जोगेश हालदार ( रा. नवेलीया पो. पुर्व विष्णूपूर ता. चारधाव. जि. नदिया (पश्चिम बंगाल) (हल्ली रा. भंडारवाडी ता. जि उस्मानाबाद) याच्याकडे त्याचा मयत भाऊ श्रीकृष्ण जोगेश हालदार (रा. वर्धा) हा त्या ठिकाणी आला. श्रीकृष्ण हालदार हा वर्धा या ठिकाणी आयुर्वेद दवाखाना चालवतो.