Breaking News

मोहरी येथे उज्वला दिनानिमित्त गॅस वितरण

पाथर्डी (प्रतिनिधी) - पाथर्डी तालुक्यातील मोहरी येथे ग्रामस्वराज्य अभियानाअंतर्गत उज्वला दिनानिमित्त गरीबांना मोफत गँस वितरण करण्यात आले. राज्य सरकार गरीबांसाठी चांगल्या योजना राबवित आहे. सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणुन युवक कार्यकर्त्यांनी जबाबदारी बजावावी. राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकारच्या सामान्य माणसाच्या हिताच्या योजना खर्‍या लाभार्थीपर्यंत जाण्याचे काम करण्यासाठी भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहीजे. कर्जमाफी,उज्वला गँस जोडणी योजना यांचा लाभ शेतकर्‍यांना व गरजुंना मिळाला पाहीजे. जलयुक्त शिवार योजनेतुन तालुक्यात चांगले काम झाले आहे. पाण्याची पातळी वाढली आहे. शासनाच्या योजना गरीबांच्या झोपडीपर्यंत घेवुन जाण्याचे काम युवक करीत असल्याचे गर्जे म्हणाले. यावेळी सरपंच कल्पजित डोईफोडे,अर्जुन धायतडक, माजी सरंपच कल्पना डोईफोडे, उपसरंपच रोहीदास खटकेलता सुसलादेकानिफ हंडाळ, हर्षदा दस्तुरकर,शारदा राजगुरु, देवीदास नरोटे,अलका नरोटे, लंका राजगुरु, तुकाराम नरोटे आदि उपस्थित होते. कल्पजीत डोईफोडे यांनी प्रास्ताविक केले. रोहीदास खटके यांनी आभार मानले.