पथदिवे गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी
पाथर्डी (प्रतिनिधी) - पाथर्डी नगरपालिकेमार्फत अंतर्गत पथदिवे गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करणेबाबत प्रांताधिकारी, तहसिलदार आणि मुख्याधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाथर्डी शहरामध्ये सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून पथदिवे बसवण्याचे काम करण्यात आले. मात्र सदरचे काम हे मूळ अंदाजपत्रकानुसार न करता मोघमपणे करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. या कामामध्ये पाईप, वायर, एलईडी बल्प यांचा वापर निकृष्ट दर्जाचे वापरले आहेत. काम करून केवळ एक दोन महिने उलटलेले तोच अनेक प्रभागातील वायरींग जळून खाक होत आहे. अनेक बल्प बंद पडत आहे. अनेक ठिकाणी पूर्वीच्या पोलवरच बल्प बसवून नवीन केले असल्याचे भासवले आहे. तसेच अनेक ठिकाणी कामे न करताच पूर्वीचेच कामे दाखवुन कामाची बिले काढली आहेत त्यामुळे
सदर पथदिव्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व या कामाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सदर ठेकेदाराला बिल अदा करू नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे.
चौकट: पाथर्डी नगरपालिका मध्ये गेल्या काही बैठकीमध्ये एलएडी घोटाळा हा विषय गाजत असुन बैठकीमध्ये आरोप प्रत्यारोप होतात.तर बैठकी नंतर ’तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी परिस्थिती आहे तर याबद्दल कोण ठोस पाऊल उचलणार हे येणार्या काळात कळेल.